आवश्यक साहित्य (Ingredients)
बनविण्याचा मार्ग (Directions)
- १ वाटी काबुली चणे आदल्या रात्री भिजत टाकावेत. दुसऱ्या दिवशी किंवा १०-१२ तासानंतर निथळावे व दुसरे पाणी व मीठ घालून कुकरमध्ये शिजवावे. काबुली चणे डब्यातले वापरल्यास ही खिटखिट करावी लागत नाही.
लिंबाचा रस काढावा. लसूण पाकळ्या वाटाव्या. सर्व जिन्नस मिक्सरमधे घालावेत व मिश्रण एकजीव होईपर्यंत मऊ वाटून घ्यावे. लहान वाडग्यात झाकून ठेवावे व गार करावे. एका डिन्नर प्लेटमध्ये गाजरे, मुळा, काकड्या, पातीचे कांदे, कॉलीफ्लॉवरचे अर्धवट उकडलेले तुरे अशा भाज्याचे उभट लांबट तुकडे मांडावे, मध्यभागी छोट्या वाटीत किंवा बोलमध्ये हा चटका ठेवावा. पार्टीमध्ये हा प्रकार जेवणाआधी ड्रिंक्सबरोबर देता येतो.
You may also like